Tuesday, June 21, 2022

बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता पथकाच्या अध्यक्षपदी पत्रकार आयेशा शेख यांची निवड.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील समाजसेविका तथा पत्रकार आयेशा रफीक शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी किन्नर सपना बाळू यांचा विवाह यशस्वीपणे लावून दिला त्यानंतर त्यांनी अनेक जणांचे संसार वाचवला. अनाथ वंचित उपेक्षित व किन्नर मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडून अनेकांना प्रवेश देखील दिले. त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिल्यामुळे व त्यांच्या कुटुंबाने त्याची साथ दिल्यामुळे त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्याची दखल घेत त्यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या महिला दक्षता पथकाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता अध्यक्षपदी पत्रकार शेख आयेशा यांची निवड झाल्याने महिलांच्या अन्याय अत्याचाराची प्रश्न महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. आता या माध्यमातून देखील समाज सेवेचे काम चालू राहणार आहे. त्यामध्ये त्यांच्या कार्याचे योगदान महत्त्वाचे असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड, पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे यांनी दिली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment