परळी वैजनाथ (प्रतिनीधी) शहरातील वेगवेगळ्या भागातील परिसरातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात परळी वै. नगर परिषद तथा परळी वै. पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागात बॅंक परिसर, ए.टी.एम. परिसर शहरातील चौकात, रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर मंदिर परिसरात आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवंण्यात आले होते.
मात्र काही दिवसापासुन शहरातील या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची दैनिय अवस्था झाली असून शहरातील बहुतांश सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद असून कही परिसरातील कॅमेरे आणि सेटअप बॉक्स गायब झालेले दिसत आहेत. या प्रकारामुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहन चोरी, शहरातील बाजार पेठ आणि घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. परळी वै. शहरातील शिवाजी राजे चौक ते श्रीनाथ चित्र मंदिर मार्गावरील श्रीनाथ चित्र मंदिर परिसरात असणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेच्या ए.टी.एम. समोरील असणाऱ्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची अनेक दिवसापासुन दैनिय अवस्था झाली असून हा कॅमेरा कित्येक दिवसापासुन बंद आहे.
शहरातील अशा अनेक भागातील सी.सी.टीव्ही कॅमेरे दुरूस्तीच्या प्रतिक्षेत धुळखात पडलेले दिसत आहेत. परळी वै. नगर परिषद तथा पोलिस प्रशानाने या प्रकाराकडे जातीने लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर शहरातील सर्व सी.सी.टीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वीत करावे असे परळीकर वासीयांचे मत येत आहे
No comments:
Post a Comment