DGCAने सांगितले की, पक्षी धडकल्यानंतर इंजिनला आग लागली. यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी विमानतळाच्या आत आहेत. सर्वांना दुपारी चार वाजता दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू आहे. विमानात 185 प्रवासी होते. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. इंजिनला आग कशामुळे लागली हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून टेक ऑफ होताच मोठा आवाज झाला. आवाज एवढा मोठा होता की सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर आगीच्या ज्वाळा वाढू लागल्या. त्यानंतर विमानतळावर गोंधळ उडाला.
फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितले की, खिडकीतून स्पार्क होताना दिसत होते. आम्ही खिडकीच्या बाजूला बसलो होतो. आगीची ठिणगी स्पष्ट दिसत होती. यादरम्यान पायलट म्हणाला – परिस्थिती नियंत्रणात आहे. मग जीव भांड्यात पडला.
No comments:
Post a Comment