नव्याने सत्तेवर आलेल्या नगराध्यक्ष यांच्या कडून बाजारतळाची व्यवस्था व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत .
Friday, June 24, 2022
केज शहरात कायमस्वरूपी बाजारतळाची व्यवस्था व्हावी नागरीकांची मागणी.
केज "प्रतिनीधी" शहरात पहिल्याच पावसाने भरलेला बाजार रिकामा करावा लागला. रस्त्यावर पाण्याचे डोह साचले विक्रेत्याला बसता येईना अन खरेदीदाराला चालता येईना अशी परिस्थिती झाली तर साचलेल्या पाण्यामुळे भाजीपाला खराब झाला अशी अवस्था झाली तर नगर पंचायत बाजारात बसण्याचे पैसे घेते मग सुविधा द्यायला काय हरकत आहे? अशी मागणी नागरिकांकडून होत आहे . केज शहरात मंगळवार व शुक्रवार असे दोन बाजार भरतात यामध्ये आजुबाजुच्या गावातुन अनेक शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी येत असतात .मंगळवार दि. २१ जुन रोजी मंगळवारचा बाजार भरलेला असताना दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली अन भरलेल्या बाजारात अक्षरशः दाणादाण उडाली .भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बाजारात बसता येईना भाजीपाला चिखल मातीमुळे भाजीपाला खराब होत होता. तर खरेदीदारास भाजीपाला घेण्यासाठी रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती.पावसामुळे खरेदी विक्री वर मोठा परिणाम झाला यामुळे नागरिकांच्या वतीने नगर पंचायत बाजारात बसणारे शेतकऱ्यांकडून कर आकारते मग बाजारात बसण्याची सुविधा करायला हवी अशी चर्चा सगळीकडे होताना दिसली तशीच काही सोशल मिडीयावर सुध्दा चर्चा होताना दिसली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment