अहमदनगर (प्रतिनीधी ) एकनाथ शिंदे यांनी राज्यात राजकीय भुकंप घडवून आणला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या अल्प मतात आल्याचे दिसत आहे.राज्यात उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
मुंडे म्हणाल्या की, सध्या तरी महाराष्ट्रातील यंत्रणेत मी नसल्यामुळे या विषयावर भाष्य करणं योग्य नाही. तर जे सुरू आहे तो महाराष्ट्र बघत आहे. त्या बीडमधील आष्टी आणि अहमदनगरमधील पाथर्डी दौऱ्यावर असताना बोलत होत्या. तसेच यावेळी मुंडे यांनी, ज्या घडामोडी घडतायत त्यावरून महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या दिशेने वाटचाल करतोय, असंच दिसतं असल्याचं म्हटलं आहे.

No comments:
Post a Comment