मुंबई (प्रतिनीधी) :- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या बैठखीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. या साऱ्या घडामोडींच्या संदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.
ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत. सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जेने ते माझ्यासोबत आले आहेत.
No comments:
Post a Comment