*महिला आरोपीला अटक सपोनि संजय निलपत्रेवार यांच्यासह पोलीसाची दमदार कार्यवाही
नांदेड "प्रतिनीधी" येथील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या दर्वेशनगर हिंगोली नाका येथील रहिवासी असलेल्या मावशीच्या घरी पुतणी दिनांक ८ जून २०२२ रोजी हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती सदररील घरात प्रवेश करुन कुलूप तोडले आणि रूमच्या आतील आलमारीतील लॉकर तोडून आत मध्ये ठेवण्यात आलेले रोख रक्कम १३ लाख रुपये व दीड टोळ्याचे गल्सर ५ ग्रामचा पत्ता ५ ग्रामची सोन्याची अंगठी, असे एकूण १४ लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला होता असल्याची तक्रार दिनांक १० जून २०२२ रोजी फिर्यादी फयुम अब्दुल गफार खुरेशी वय तीस वर्ष व्यवसाय व्यापारी गवळीपुरा हिंगोली नाका नांदेड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हाचे पोलीस अधिकक्ष प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर चंद्रशेन देशमुख यांच्या सुचेनेनुसार वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा पथक प्रमुख संजय डी निलपत्रेवार यांनी त्यांच्या पोलीस टीम मधील पोलीस कर्मचारी पोना किडे,विजय नंदे, संतोष बेलूरोड,शेख इम्रान,रमेश सूर्यवंशी व महिला पोलीस कर्मचारी शुभांगी कोरगावे आदीनी कौतुकास्पद कामागिरी बजावली आणि महिला आरोपीस जेरबंद करण्यात यशस्वी पोलीस कार्य पार पाडले आहे.
वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणात ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी आपल्या पोलीस सहकार्यासह फिर्यादीच्या पत्नीस विश्वास घेऊन तपास जारी केला असता तिच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल नगदी तेरा लाख ८० हजार ३३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरच्या महिला आरोपीस मा. न्यायालयात वजीराबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवाड यांच्यासह साहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी हजर केले असता त्या महिला आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याचे सपोनि निलपत्रेवार यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना ही माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment