परळी वैजनाथ (प्रतिनिधी) यंदा हॉल, मंडप, डेकोरेशन यावर अवाढव्य खर्च करत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहे. तरी देखील समाजासाठी आपण काही देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत परळीपासून जवळच असलेल्या मौजे जिरेवाडी येथील युवक नेते प्रविण भगवानराव कांदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व परिसरात वृक्षारोपन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आज सकाळी प्रवीण कांदे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सोमेश्वर महाराज यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व केक कापून सत्कार करण्यात आला.
परळीपासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या मौजे जिरेवाडी हे श्री सोमेश्वर महाराजांच्या पावनभूमीने नटलेले गाव असून येथील युवा नेते प्रविण भगवानराव कांदे या तरुणाने युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही उद्दात भूमिका डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत प्रविण कांदे या तरुणाने शुभेच्छा आणि भेटवस्तूच्या संस्कृतीला बाजूला सारून जिरेवाडी येथील होतकरू मुलांना वह्या व पेनचे वाटप व परिसरात वृक्षारोपन केले. दरम्यान प्रवीण कांदे मित्र परिवाराच्या वतीने जागृत देवस्थान श्री सोमेश्वर महाराजांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.दरम्यान अशा वाढदिवसाच्या उपक्रमाचे खरंच कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण तरुण श्रीमंती दाखवण्याच्या नादात हजार रुपये खर्च करतात परंतु प्रविण कांदे यांनी सामाजिक बांधिलकीतून वही व पेन दिल्याने होतकरू मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलले या कौतुकास्पद वाढदिवसाचे कौतुक होत आहे, या तरुणाने सामाजिक भान जपण्याची प्रेरणा तरुणांच्या समोर ठेवली आहे.
No comments:
Post a Comment