Tuesday, June 7, 2022

दूरदर्शनचा आवाज गेला. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन.



 वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात टीव्ही मीडियात त्यांनी आपली अमीट मुद्रा उमटवली. अशी माहिती सह्याद्री वाहिनीने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरुन अधिकृतरित्या दिली आहे. प्रदीप भिडे यांनी आपल्या बहारदार आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात 40 वर्षे अधिराज्य केले. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. प्रदीप भिडे एप्रिल 1974 पासून दूरदर्शनमधे दाखल झाले. त्यावेळी भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक सहकारी होते.

No comments:

Post a Comment