Sunday, June 12, 2022

दहावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी.पंधरा जूनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता.


मुंबई (प्रतिनीधी ) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता सर्वांनाच दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याकडं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाचे 16 लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाची उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल असं राज्याच्या शिक्षण मंडळाकडून या आधी सांगितलं होतं. पुढच्या चार ते पाच दिवसात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. 15 जूनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment