Saturday, June 11, 2022

उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरीकांची उकाड्यापासुन सुटका. परळीत वादळ वाऱ्यासह वरूणराजाची हजेरी.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी तालुक्यात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह वरून राजाने हजेरी लावल्याने परीसरात काही क्षणात पाणीच पाणी वरून राजाच्या दमदार सुरवातीने तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य माणुस सुखावला. 

         परळी वै. तालुक्यात उष्णतेच्या तीव्रतेने काही दिवसापासुन तापमान वाढलेले असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यात नागरीकांना पाणीटंचाई सरख्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते.परंतु दिनांक ११ जुन २०२२ रोजी सायंकाळच्या वेळी पावसाने विजेच्या कडकडाटासह वरून राजाने मान्सुनची दमदार सुरवात केल्याने आणि  परळी वै. शहर परिसरात आणि तालुक्यात हजेरी लावल्याने कित्येक दिवसापासुन उष्णतेमुळे हैराण असलेल्या नागरीकांना काही काळापुर्ती उकाड्यापासुन सुटका मिळाली असून परिसरात पाणीच पाणी झाल्याने वातावरण थंड झाले आहे. शेतीच्या मशागतीची कामे पुर्ण करून पेरणीच्या कामासाठी वरून राजाची वाट पाहणारा आणि लगबग करणारा शेतकरी वर्ग सुखावला असून शेतकरी राजासाठी पेरणीच्या कामासाठी रस्ता मोकळा झाला आहे. वादळवाऱ्या सह पडलेल्या या पावसामुळे परिसरातील उष्णता कमी झाली असून नागरीकांनी उष्णतेपासून मोकळा श्वास घेतला आहे. पडलेल्या पावसामुळे परिसारातील लोकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयास मिळत आहे.

No comments:

Post a Comment