बीड (प्रतिनिधी) दि.06 - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मातंग समाजाच्या युवतीवर काही गुंडांनी धारदार शस्त्राने अमानुष हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.या प्रकरणी अद्याप हल्लेखोरांना अटक झाली नसल्याने बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांस ससाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आरती धुरंधरे या युवतीला शसस्त्र मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी बहुजन विकास मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे निदर्शने केली. याप्रसंगी पदाधिकारी जय तांगडे युवा जिल्हा आध्यक्ष
विनोद शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष
बाबासाहेब वाघमारे नगरसेवक,शांतिदूत घोडके,सिद्धार्थ जोगदंड,सचिन ससाणे,प्रदीप शेवाळे,अशोक हुंबरे,प्रदीप काळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment