Monday, June 6, 2022
केज च्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला..! भावानेच केला हल्ला .
केज (प्रतिनीधी) येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांच्यावर कार्यालयातच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.सदरील हल्ला हा त्यांच्या भावानेच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, कोयत्याने चार वार केल्यामुळे नायब तहसीलदार आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून हल्लेखोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तर आशा वाघ यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले असल्याचे समजते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment