Friday, June 3, 2022

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद बीड च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

बीड (प्रतिनिधी)  कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विविध समस्या सोडविण्याबाबत राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद बीडच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यशास्त्र विषय कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सर्व शाखांकरीता इंग्रजी, मराठी विषयाप्रमाणे अनिवार्य करावा, ११ वी आणि १२ वी च्या नवीन अभ्यासक्रमात बदल करून त्यात भारतीय
 संविधानाची ओळख करून देणारा अभ्यासक्रम असावा, २०,४० टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान द्यावे आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रा. रमेश टाकणखार, प्रा. संदीपान हिंगे, प्रा. बापु घोलप, धायतीडक, वारे, देशमुख, मार्कंड, करांडे, मुसळे, पाठक, तावरे, हराळ,पवळ आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment