Thursday, June 2, 2022

नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांची मराठवाडा बाहेर तात्काळ बदली करा.परळी वकील संघ आक्रमक !

  

परळी वैजनाथ  (प्रतिनीधी) परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांची मराठवाडा बाहेर तात्काळ बदली करा अशी आक्रमक मागणी परळी वकील संघाने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की परळी न्यायालयामध्ये होणारे कोर्ट डिग्री प्रकरण यांच्या आधारे फेरफार मंजूर करण्यास अनेक तलाठी व मंडळ अधिकारी हे नकार देत आहेत व त्यावर बीड येथे जाऊन मुद्रांक शुल्क भरा असे सांगत आहेत . याबाबत महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी स्पष्ट खुलासा केला आहे की कुटुंबातील होणाऱ्या तडजोडपत्रावर केवळ 100 रुपये पेक्षा जास्त मुद्रांक शुल्क लागत नाही. तसेच याबाबत महसूल व वन विभागाने वेळोवेळी परिपत्र शासन परिपत्रक काढून वाटणीपत्र बाबत नोंदणी कृत करण्याची मागणी करू नये असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही मंडळ अधिकारी व तलाठी हे वाटणी बाबतचे कोर्ट डिक्री हे नोंदणीकृत करून आणा म्हणून परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक व नाडवणूक करत आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे .याबाबत बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्यांचे मुद्रांक शुल्क बाबतचे परिपत्रक रद्द केले असतानाही परळी तहसीलमधील नायब तहसीलदार रुपनर हा कोणताही लेखी आदेश न देता तोंडी आदेशावर तो फेरफार घेऊ नये असे महसूल अधिकाऱ्यांना सांगत आहे .तलाठी व मंडळ अधिकारी हे अर्ज घेत नाही पोचपावती देण्यास तयार नाहीत. सर्व तोंडी आदेशावरून परळी तहसीलचा कारभार हा चालू आहे .याला केवळ रुपनर  हाच जबाबदार असल्याबाबत खात्री पटल्यामुळे परळी वकील संघाने एक ठराव घेऊन रुपनर यांची तात्काळ बदली मराठवाड्याच्या बाहेर करण्याची मागणी केली आहे. कलम 85 महाराष्ट्र महसूल अधिनियम हा धाब्यावर बसून शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन तलाठी व मंडळ अधिकारी हे बेकायदेशीरपणे शंभर रुपयाच्या बोर्डवर संमती पत्र किंवा वाटणी पत्र याच्या नावाखाली बेकायदेशीर फेरफार घेत आहेत व कोर्ट आदेशाचा अवमान करत आहेत. सदर महसूल अधिकारी हाच यास कारणीभूत असल्यामुळे संतप्त होऊन परळी वकील संघाने त्याची  मराठवाडा महसूल विभागाच्या बाहेर बदली करण्याची मागणी केली आहे.
रुपनर यांच्याविषयी अनेक तक्रारी असून परळी तहसील कार्यालयातील तहसीलदार हे पद नॉमिनल होऊन बसले आहे. रुपनर यांच्या सांगण्यावरून परळी येथील तहसीलमध्ये न्याय मागण्यासाठी येणाऱ्या दहा-पंधरा कार्यकर्त्यावर शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत .रुपनर यांच्या दालनात नेहमी एजंट लोकांचे उठबस असते.तो पक्षपाती पणा करतो. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची खात्री देता येत नाही.रुपनर हा स्थानिक असल्यामुळे स्थानिक राजकारणात त्याची नेहमी चालू असते. त्यामुळे रुपनर यांची मराठवाडा महसूल विभागाच्या बाहेर तात्काळ बदली करावी अन्यथा 1 जुलै 2022 पासून परळी तहसील समोर परळी वकील संघ साखळी उपोषण करण्याचा इशारा परळी वकील संघाने दिला आहे.
. यावेळी परळी वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री. अँड वैजनाथ नागरगोजे,अँड अनिल मुंढे अँड.प्रकाश मराठे, अँड.डि.एल.उजगरे, अँड .एच.व्ही.गुटटे,वकिल संघाच्या सचिव उषा दौंड.अड मिर्झा मंजुर अली अँड.राजेश नागापूरकर अँड. आर.व्ही.गित्ते, ॲड वाय आर सय्यद,अँड श्रीकांत कराड  अँड लक्षमण अघाव, अँड. सुनील सोनपीर, अँड विलास बडे अँड धनाजी कांबळे, अँड डि पी कडबाने अँड.व्हि डी धुमाळ अँड.जे एस मुंडे, अँड घोडके  अँड.पोतदार, अँड शशीकांत चौधरी  अॅड.लक्ष्मीकांत मुंडे, अँड शरद सातभाई, अँड आबा सोळंके अँड.शाकिर सय्यद, अँड शेख इजाज. अँड संजय शेटे अँड .दस्तगिर शेख अँड.राहुल सोळंके, अँड.शेख शफीक, अँड.प्रविण फड अँड.इरफान खान अँड.केशव अघाव,अँड.रूद्र कराड, अँड.बालाजी कराड ईत्यादी उपस्थित होते.
.

No comments:

Post a Comment