परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या फेब्रुवारी मार्च 2022 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी औरंगाबाद विभागाचा निकाल जाहीर झाला यात जवाहर शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेज परळी वैजनाथची कु. साक्षी आनंद मुंडे या विद्यार्थिनीने 90.66 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत घवघवीत यश संपादन केले आहे तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेश्राम उपप्राचार्य प्राध्यापक हरीश मुंडे पर्यवेक्षक प्राध्यापक मंगला पेकमवर तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment