Sunday, September 6, 2020

जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष युवकांचे आधारस्तंभ बबनभाऊ गित्ते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.


*निर्जंतुकीकरण, राशन कार्ड वाटप, 51 कुटूंबांना अन्नधान्याचे वितरण.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी);-जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यंाचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांनी आगळया वेगळया पदध्तीने राबवत सामाजिक उपक्रमांचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. काही गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यासोबतच अन्नधान्य वाटप असेही उपक्रम हाती घेण्यात आले. दरम्यान बबनभाऊ गित्ते यांनी आपला वाढदिवस परिवारासह निवासस्थानी अत्यंत साधेपणाने साजरा केला. 
वाढदिवस म्हटलं की फटाक्यंाची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि हार तुऱ्यांचा पडलेला खच असेच चित्र नेहमीच दिसते. परंतू बबनभाऊ गित्ते यांच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला आहे. 
जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आज 5 सप्टेंबर रोजी धर्मापुरी व नंदागौळ येथे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेवून निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले. संपूर्ण गाव परिसरात जंतु नाशकांची फवारणी करण्यात आली. 
बबनभाऊ गित्ते यांचे समर्थक राजेश फड मित्र मंडळाच्या वतिने 51 कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. धर्मापुरी, भोजनकवाडी येथेही निर्जंतुकीकरण करण्यात आले. नागापुर येथील नागरिकांना वाढदिवसानिमित्त रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. 
दरम्यान वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी आपल्या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी तथा पं.स.सभापती सौ.उर्मिलाताई गित्ते, वडिल पांडुरंगराव गित्ते व परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यकर्त्यांनीही सामाजिक अंतर ठेवून बबनभाऊ गित्ते यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच परळी शहर व तालुक्यातील अनेक भागातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आदींनीही बबनभाऊ गित्ते यांना दुरध्वनीवरून शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment