परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बँकेच्या एका अधिकार्याने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, महेश अर्बन को आॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र अरुण सोनार वय ५२ वर्षे या.विद्यानगर परळी यांनी अंबाजोगाई रस्त्यावरील घाटालगत एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. देवेंद्र सोनार हे दि.२३ रोजी नेहमीप्रमाणे बँकेत जातो म्हणून घरातून गेले ते परत आलेच नाही.म्हणून त्यांच्या पत्नीने दि.२४ रोजी पोलीसात आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी पोलीसांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment