Friday, September 11, 2020

स्थानिक गुन्हे शाखेची परळी शहरात मटका अड्ड्यावर धाड.


बीड (प्रतिनीधी )- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मटक्याचा धंदा सुरू असून परळीत संभाजीनगर पोलिस ठार्‍याच्या हद्दीत मटका अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेत पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही एपीआय कांगुणे यांच्या टिमने केली. 
   परळी शहरातील हॉटेल अंजुमन समोर मटका एजंट मटका घेत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसर्‍या गुन्ह्यात परळी बसस्थानकासमोर तीन मटका एजंटांना ताब्यात घेत ३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई एपीआय कांगुणे, झुंबर गर्जे, संतोष हंगे, गोविंद काळे, अन्वर शेख या पोलिस कर्मचार्‍यांनी केली. 

No comments:

Post a Comment