Saturday, September 19, 2020

कोरोनामुळे मृत्यू अंत्यसंस्कार कोणी करायचा ? बाधीताचा मृतदेह ऍम्ब्यूलन्समध्ये.


* महसूल प्रशासन झोपेत, तहसीलदारांना माहिती देऊनही अंत्यसंस्कारास टाळाटाळ, नातेवाईकांचा आरोप.

माजलगाव (प्रतिनीधी)- जगभरात थैमान घातलेला कोरोनाने शहरासह ग्रामीण भागात पाय पसरविले आहेत. तालुक्यात कोरोनाचे मिटर वाढतेच आहे. शहरातील एका खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडल्यानंतर मृतदेह तब्बल दहा तास ऍम्बुलन्समध्येच ठेवण्यात आला. याबाबत मृताच्या नातेवाईकांनी तहसिलदारांना माहिती देउनही अंत्यसंस्कार करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे महसुल विभाग आणि नगर पालिका मात्र झोपेत होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजलगाव तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असुन या ठिकाणी कोरोना पॉंझीटीव्ह रूग्णाच्या मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे.शहरातील एका कोव्हीड हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता एका कोरोना पॉंझीटीव्ह रूग्णाचे निधन झाले. याबाबत येथील डॉक्टर व नातेवाईकांनी आरोग्य , महसुल, नगरपालिका प्रशासनाला याची माहिती दिली. या डेटबॉंडीला येथुन तात्काळ हलवणे नगरपालिकेचे काम असतांना व त्यांच्या संबंधीत विभागाच्या कर्मचार्‍यांना वारंवार सांगुनही ते रात्री न आल्याने ही डेटबॉंडी सकाळी ८ वाजेपर्यंत रूग्णालयातच पडुन होती.ही डेटबॉंडी या ठिकाणीच पडुन राहिली.
या बाबत तहसीलदार यांना रात्रीच कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाचा नातेवाईकांनी केला आहे. या पुर्वीही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशीच एक डेटबॉंडी पंधरा दिवसापुर्वी ४ ते ५ तास पडुन होती.यामुळे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची हेळसांड होत असुन अनेक तास डेटबॉंडी एकाच जागेवर पडुन राहील्याचा याचा साईड इफेक्ट होण्याची भीती नातेवाईकांकडुन व्यक्त केली जाते आहे.

No comments:

Post a Comment