
बीड (प्रतिनीधी ):- शहरातील कंकालेश्वर कुंडात एका 44 वर्षीय इसमाचा मृतदेह आज सकाळी 8.30 वाजता आढळून आल्यानंतर घटनास्थळी पेठ बीड पोलीसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला.
बाळासाहेब विनायकराव ढेरे (वय 44 वर्षे रा.धांडे गल्ली बीड) यांचा आज सकाळी 8.30 वाजता कंकालेश्वर कुंडात मृतदेह तरंगतांना येथील नागरिकांना दिसला. याची माहिती बीड ग्रामिण पोलीसांना दिल्यानंतर घटनास्थळी एपीआय बासरवाल, हे.काँ.जाधव, खाडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कुंडाबाहेर काढुन तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. मयत ढेरे यांनी आत्महत्या केली की घातपात आहे या प्रकरणाचा पेठ बीड पोलीस तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment