परभणी :- सार्वजनिक स्वच्छता गृहाला ना कोणी बाप असतो ना बेटा. नावातच सार्वजनिक असल्याने प्रत्येकजण त्या ठिकाणचा मालक असतो. संडासचे डब्बे चोरून नेण्यापासून ते लाईट काढण्यापर्यंतचे उद्योग अश्या ठिकाणी सर्रास होत असतात. संडासाची अवस्था तर पाहता सोय नाही.अशी कोणतीच भिंत नसते ज्यावर मट्रेलने रंग रंगोटी केलेली आढळणार नाही. आता काही जणांचा ते खाल्याशिवाय, तंबाखू , बिडी ओढल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही हा भाग निराळा.आपण जशी घरी स्वच्छता ठेवतो तशी या ठिकाणी ठेवली तर काही बिघडले का ? पण का म्हणून ठेवायची.इथे येणाऱ्या प्रत्येकाला माहीत असते की आपल्याला उद्या याच ठिकाणी यायचे आहे तरीही तो तसेच वागतो.काही जणांना तर पहिलीच सवय असते काम झाले की तसेच उठून जायचे .जवळचा नळ लावून एक एक्स्ट्रा बकेट पाणी टाकायचा त्रास तो घेत नाही.काही स्वच्छता गृह हे तर प्रेमी युगुलाना भेटण्याचे ठिकाण सुद्धा झाले आहे.
हे होऊ नये म्हणून महानगर पालिकेच्या वतीने तेथे कर्मचारी नेमले आहेत.परंतु ते त्या ठिकाणी हजर राहतील तर ना.अहिल्याबाई होळकर नगर येथील स्वच्छतागृहाची हीच अवस्था पहायला मिळते.येथे पुष्कळ वेळा कर्मचारीच हजर नसतो.कर्मचारी हजर नसल्याने याठिकाणी दोन दिवसापूर्वी एका 25 वर्षीय युवकाने महिला आत गेली असताना बाहेरून दरवाजा लावून घेतला .महिलेने आरडा ओरड केल्यानंतर त्यानेच धावत येऊन दरवाजा उघडला त्यानंतर त्याला जमावाने धो धो धुतला .परंतु अश्या ठिकाणी कधी कोणता प्रसंग येईल काहीही सांगता येत नाही.तेंव्हा महिलांच्या सुरक्षेचे काय असाही प्रश्न येथील नागरिक विचारत आहे.पण लक्षात कोण घेतो ? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

No comments:
Post a Comment