अहमदपूर ;- ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समिती कार्यालय आणि ग्रामीण विकास लोक संस्थेत हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले.पं.स.कार्यालयात सकाळी ठीक ०८:०५ वाजता, सभापती सौ.जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
तर सकाळी ठीक ०८: ३० वाजता नांदेड रोडवरील ग्रामीण विकास लोक संस्थेच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते हरिदास तम्मेवार आणि सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड,मच्छिंद्र गोजमे,पत्रकार तथा प्रा.भगवान आमलापुरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन केले.
यावेळी एस ए खंदारे यांच्या हस्ते एकल पालकांच्या ३० मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.प्रा.मदने गणेश आणि कवी प्रल्हाद साबळे यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment