बीड, दि,11 :- जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची नोंदणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने http://www.rojgar.mahaswayam.gov.in हे वेब पोर्टल व गुगल प्लेस्टोर मध्ये Mahaswayam हे Application विकसीत केले आहे. सदर वेब पोर्टल वर जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करावी
तसेच यापुर्वी जिल्हयातील ज्या सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेली असून आधार क्रमांक आपले नोंदणी क्रमांकासी संलग्न केलेले नाही व आपले ईमेल, मोबाईल क्रमांक व पत्ता अद्यावत केलेला नाही. अशा उमेदवारांनी सदर वेब पोर्टलवर अथवा गुगल प्लेस्टोर मधून Mahaswayam हे Application ॲन्ड्रॉइड मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन आपली नोंदणी आधार क्रमांक, ईमेल, मोबाईल क्रमांक व पत्ता इत्यादीसह दिनांक 30 सप्टेंबर 2020 पूर्वी अद्यावत करावी. अन्यथा आपली महास्वयंम वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होईल. तसेच नोंदणी अद्यावत करण्यासाठी उमेदवारांना काही अडचण आल्यास bidrojgar@gmail.com या ईमेलवर अथवा दुरध्वणी क्रमांक 02442-222348 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.असे आवाहन सु.रा.वराडे, प्र.सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*
No comments:
Post a Comment