बीड - बीडला अक्षरशः चिखलाचे शहर क्षीरसागर कुटुंबीयांनी बनवून टाकले आहे. आपआपल्या हिस्स्यासाठी या बंगल्याने बीडकरांचे हाल सुरु केले असल्याचे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीडच्या जनतेशी थेट संवाद साधताना म्हटले आहे. रस्त्याच्या कामात दिरंगाई अन् अडवणुकीच्या बाबतीत अडवलेल्या सर्व ठिकाणी जाऊन आ. मेटे यांनी रस्त्यांची पाहणी करून लोकांची विचारपूस, चौकशी केली.
शिवसंग्रामकडून गेल्या ४ वर्षांपासून जनतेच्या हितासाठी क्षीरसागरांना निर्णय घेण्यास भाग पाडले गेले मात्र आता एकाच घरात सर्व महत्वाची पदे घेऊन क्षीरसागरांचा बंगला बीडकरांचे हाल करू लागला आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. ही कामे आज सुरु झालेली नाहीत, दोन वर्षांपासून एकच रस्ता पूर्ण होत नाही. या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. शहरातील रस्त्याची कामे दर्जेदार व तात्काळ कशी होत नाहीत तेच पाहू, शिवसंग्राम तात्काळ व दर्जेदार रस्त्यासाठी आग्रही असेल असे आ. मेटे यांनी आक्रमक होत म्हटले आहे.
महिनो-महिना रस्ते खोदून ठेवण्यात येत आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाणी साचत असल्याने लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. डेंग्यू अन मलेरीयाचे शेकडो पेशंट कोरोनासोबत वेगवेगळ्या दवाखान्यात पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी संवादादरम्यान मेटे यांच्याकडे आपली कैफीयत मांडत होणाऱ्या त्रासाबाबत आपले गाऱ्हाणे मांडले. नगरपालिकेच्या आणि स्थानिक आमदाराच्या वाट्यामुळे शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः या चुलत्या-पुतण्यांनी वाट लावली आहे. ठिक-ठिकाणच्या कामाच्या देवघेवमुळे त्यांच्यातील होणारे वाद हे काम लांबणीवर पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका क्षीरसागराला दाम मिळाले की काम सुरु होते मात्र दुसर्याला हिस्सा मिळाला नाही की काम बंद होते. या क्षीरसागरांच्या देवघेवीमुळे शहरातील बहुतांश कामे बंद पाडली गेली आहेत. त्यामुळे बीड शहरातील गोरगरीब जनता मात्र यात भरडली जात असल्याचे यावेळी मेटे म्हणाले.
बीड शहर दौऱ्यावेळी जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, मनोज जाधव, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जाकेर हुसेन, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, मछिंद्र कुटे, विनोद हातागळे, अक्षय माने, किशोर गिराम, इकबाल रेहमान, कुरेशी, अझहर भाई, प्रशांत डोरले, सलमान अली, अनिकेत देशपांडे, हरीश शिंदे, सौरभ तांबे, सुनील धायजे, शकील भाई, विजय सुपेकर, शैलेश सुरवसे आदींसह शिवसंग्राम कार्यकर्ते, पदाध{कारी, ठिकठिकाणचे बीडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment