Tuesday, September 15, 2020

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार.

 

पुणे l पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारपासून (१६ सप्टें.) पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांंपासुन मध्य आणि पुर्व महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ , मराठवाडा भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अशातच आता आयएमडी (IMD) ने ही परिस्थिती पुढील 4 ते 5 दिवस कायम राहणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. आयएमडी कडुन जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार महराष्ट्रात मुख्यतः मराठवाडा आणि लगतच्या भागात येत्या चार पाच दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. यामध्ये 17 सप्टेंंबर पासुन पावसाचा जोर आणखीन वाढेल असेही सांंगण्यात आले आहे. आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांंनी याविषयी ट्विटमधुन माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment