* नवरात्र, दसरा सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येणार.
मुंबई (प्रतिनीधी) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साधेपणानं साजरी करा, असं मुख्यमंत्र्यानं म्हटलं आहे. गणपती उत्सवादरम्यान जसं सहकार्य केलं त्याचप्रकारे नवरात्र, दसरा सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगीतले .
गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होतं. त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येणार आहे.
दरम्यान, येत्या 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी सण साजरा होणार आहेत. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment