
नेकनूर (प्रतिनीधी )- चौसाळा येथील एका ऍग्रो एजन्सीमध्ये चोरी करून चोरट्यांनी दुकानातील पावणे तीन लाख रुपये चोरून नेले होते. या चोरी प्रकरणाचा तपास एलसीबीने २४ तासांच्या आत लावला. काल दुपारी या प्रकरणातील चोरट्यास ढोकी येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
चौसाळा येथील शशिकांत खोड यांच्या जगदंबा ऍग्रो एजन्सीमध्ये परवा रात्री चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीचा तपास एलसीबीने लावला. चोरटा उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबीच्या टिमने सदरील चोरटा अशोक दिलीप कळसकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद जगताप, श्रीमंत उबाळे, राहुल शिंदे, चालक जाधव यांनी केली. या चोरट्यास नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव हे करत आहेत.
No comments:
Post a Comment