Monday, September 21, 2020

आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय-डॉ.अरुण सावंत

* सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन करत वंचितची विभागीय बैठक संपन्न.

बीड (प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच सर्वसामान्य नागरिक, वंचित, उपेक्षित घटक यांचे प्रश्न सातत्याने उपस्थित करून त्यावर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक भाजपा हे एकमेकांवर कुरघोड्या करत सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात अॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय जनतेसमोर असेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष माजी कुलगुरु डॉ.अरुण सावंत यांनी मराठवाडा विभागाच्या कार्यकारिणीच्या प्रश्न बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलतांना केले.
बीड येथे झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीच्या अध्यक्षपदी अशोक भाऊ हिंगे हे होते. यावेळी बोलतांना श्री.हिंगे म्हणाले की, समाजातील सर्व घटकांसाठी लढणारे नेतृत्व म्हहणजे अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर हे होय. पदाधिकार्‍यांनी त्यांचे विचार समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोंचवून वंचित बहुजन आघाडीचे स्थान मजबूत करावे.
या बैठकीला उपाध्यक्ष केशव मुद्देवाड, उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल , उपाध्यक्ष दिपक डोके, महासचिव रमेश गायकवाड ,  महासचिव संतोष सुर्यवंशी, प्रवक्ते धर्मराज चव्हाण,  कार्यक्रम प्रमुख जितेंद्र सिरसाठ, प्रशिक्षक सुरेश शेळके ,सदस्य भैय्यासाहेब नागटिळक ,सदस्य संघरत्न कुर्‍हे उपस्थित होते.      यावेळी  मराठवाडा कार्यकारिणी चा सत्कार बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.

No comments:

Post a Comment