* शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरलेंची पत्राद्वारे महाविद्यालयांना विनंती.
बीड : (प्रतिनीधी ) कोरोनामुळे सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. पोटापाण्याची सोय लावणे शक्य नसताना आता मुलांच्या प्रवेश फीचे ओझे देखील पालकांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या अडचणीच्या काळात महाविद्यालयांनी त्या त्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात शक्य तेवढी सूट देता येईल तेवढी द्यावी अशी मागणी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरले यांनी केली आहे.
कोरोनाच्या कठीण काळात सर्वत्र आर्थिक सावट पसरले आहे, अशा काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असणाऱ्या शैक्षणिक शुल्कांमध्ये सूट मिळाल्यास पालकांना दिलासा मिळेल. यासाठी बीड मधील महाविद्यालयांना प्रशांत डोरले यांनी पत्र देत विनंती केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, तंत्रशिक्षण, संगणक शास्त्र, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी व तंत्रशिक्षण, पारंपरिक अभ्यासक्रम आदी महाविद्यालयांना हे पत्र दिले आहे. यावेळी डोरले यांच्यासह शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment