Monday, September 14, 2020

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सर्व आमदार, खासदारांनी एकत्र यावे.


* राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले.


नवी दिल्ली.... मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता न्यायालयीन लढाई सोबतच लोकप्रतिनिधींची जबाबदारी महत्वाची आहे. राज्यातील सर्व आमदार, खासदारांनी याकरीता एकत्रित येवून समाजासाठी उभे राहावे, असे आवाहन राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. राज्यातील नेत्यांनी एकत्रित येवून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत मराठा समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या पाहिजे, असे मतही सोमवारी छत्रपती संभाजी यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश हा पर्याय असू शकतो का? हे सरकारने ठरवले पाहिजे. पंरतू, समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष सरकारने द्यावे. ज्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. याकरीता सत्ताधारी तसेच विरोधकांनी एकत्रित यायला हवे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी २००७ पासून लढा देत आहे. पंरतू, आता न्यायालयीन लढाईसाठी राज्यातील सर्व आमदार, खासदारांनी एकत्रित यायलाच हवे, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले.

No comments:

Post a Comment