Wednesday, September 30, 2020

पोलीस अधीक्षकाचा आदेश आला.आणी पकडला हातभट्टीवाला अवैध दारूवाला.जिल्ह्यातील वाळू, राशन माफियांसह पत्त्याचे क्लब, मटक्याच्या धंद्याचे काय ?



बीड (प्रतिनीधी )- नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या अवैध धंद्यांवरील आदेशानंतर ठाणेप्रमुखांनी एसपींना खुश करण्या इरादे थातूरमातूर कारवाया करत जिल्ह्यात जे प्रमुख अवैध धंदे आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून भर पावसाळ्यात वाळु माफिया वाळुची तस्करी करताना दिसून येत आहेत तर मटका, पत्त्याचे क्लब यासारखे धंदे आजही तेजीत आहेत. राशन माफियासह आयपीएलचा सट्टाही जिल्ह्यात जोर धरून आहे. याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होत असल्याने हजार-पाचशेचा हप्ता बंद परंतु पाच-पन्नास हजाराचा हप्ता मात्र सुरू असल्याने केवळ हातभट्टी चालकांवर थातूरमातूर कारवाई  होताना दिसून येते. 
    जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून चार्ज घेताच जिल्ह्यातले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे थातूरमातूर काम जिल्हाभरातून करण्यात येऊ लागले. केवळ हातभट्टी दारू आणि अवैध दारू विक्रेत्यांना पकडून आणत त्यांच्यावर केसेस करून आपल्या हद्दीत एवढेच अवैध धंदे आहेत हे दाखवण्याचा प्रयास केला मात्र जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार सर्रासपणे सुरू आहे. पत्त्याचे क्लब ठिकठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातील माफियागिरी सर्रासपणे सुरू आहे. भर पावसाळ्यात वाळुची तस्करी ठिकठिकारी होताना दिसून येते. छोट्या - मोठ्या नदी पात्रात पाणी असताना वाळु येते कुठून? हा प्रश्‍न उपस्थित होतो तेव्हा मापियांनी मोठ्या प्रमाणावर वाळुची साठेबाजी केल्याचे उघडकीस येते. मात्र पोलिस यंत्रणेला हे वाळुचे साठे सापडत नाहीत. राशन माफियांच्या गाड्याही पोलिसांना मिळून येत नाहीत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी आदेश दिला म्हणून ठाणे प्रमुखांनी ठाण्यात बसून हातभट्टीसह अवैध दारू विक्रेत्यांना भ्रमणध्वनी करून पोलिस ठाण्यात बोलवून घेतले आणि केसेस केल्या. एखाद-दुसरी कारवाई ही थेट घटनास्थळाची पहावयास मिळाली. अवैध धंदे बंद करायचे असतील तर बीडची माफियागिरी बंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. 

No comments:

Post a Comment