Saturday, September 19, 2020

बीड जिल्हा बाहयरूग्ण स्थलांतरीत सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता तरी दुरूस्त करा.


बीड (प्रतिनीधी )- जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड सेंटर उभाण्यात आल्याने येथील बाह्य रुग्ण व अंतररुग्ण विभाग नाळवंडी नाका परिसरातील आदित्य डेंटल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. या रुग्णालयात जाण्यासाठी रस्ताच धडाचा नाही. आदळत-आपटत रुग्णांना रुग्णालय गाठावे लागते. रुग्णालय आहे याचे भान ठेवून नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील रस्ता दुरुस्त करण्याची मेहरबानी करावी, अशी मागणी केली जात आहे. 
   गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील अंतर आणि बाह्य रुग्ण विभाग नाळवंडी नाका परिसरात असलेल्या आदित्य डेंटल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थीत नाही. तेलगाव नाका ते नाळवंडी नाका या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रुग्णांना आदळत-आपटत कसेबसे रुग्णालय गाठावे लागते. रुग्णालयाकडे जाण्यासाठी निदान रस्ता तरी व्यवस्थीत असायला हवा. याची दखल शासन-प्रशासनाने घ्यायला हवी मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. सध्या पावसाळा सुरू असून खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने याचा त्रास रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहरबानी करून रस्ता दुरुस्त करावा, अशी कळकळीची मागणी रुग्ण व त्यांचे नातेवाई करू लागले आहेत. 

नाळवंडी नाका परिसरात 
रस्त्याच्या कडेने कचर्‍याचे ढिग
बीड शहर स्वच्छ करणार असल्याचा दावा नगरपालिका उठल्या-बसल्या करत असते, प्रत्यक्षात मात्र सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि कचर्‍याचे ढिग दिसून येतात. नाळवंडी नाका परिसरातील रस्त्याच्या कडेने कचर्‍याचे ढिग जमा झाल्याने यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. 

No comments:

Post a Comment