Thursday, August 6, 2020

मिलिंद विद्यालयात दहावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान .

 परळी (प्रतिनिधी) दि. 6 आॅगस्ट रोजी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम तीन आलेल्या कु. यशश्री सिद्धेश्वर  रनखांबे, कु. वैष्णवी परशुराम गित्ते व कु. विशाखा विश्वास रोडे या विद्यार्थीनींचा  सत्कार शाळेचे मुख्याध्यापक  पवार के.एन. , पर्यवेक्षक  कोम्मावार आर.जी वरीष्ठ शिक्षक कांबळे वसंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  पवार सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या  महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या  सत्काराचा मोठा कार्यक्रम ईच्छा असूनही घेता येऊ शकत नाही याबाबत शाळेचे पर्यवेक्षक . कोम्मावार सर यांनी बोलताना खंत व्यक्त केली. जेष्ठ शिक्षक  कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिघांच्या परिश्रमाचे फलीत आहे असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी जेष्ठ शिक्षक .  लोणीकर सर, दराडे सर, नाकाडे मॅडम, कोम्मावार मॅडम, बनसोडे मॅडम, काटकर मॅडम, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनंतराव जगतकर  यांनी भ्रमणध्वनीवर विद्यार्थी,पालकांना  शुभेच्छा कळविल्या आहेत.

No comments:

Post a Comment