
मुंबई (प्रतिनीधी ):- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपासभापती पदाच्या निवडणुकीत सभापती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजलगाव कृषी उत्पन्ना बाजार समितीचे सभापती अशोक डक तर उपसभापती म्हणून कॉंग्रेसचे धनंजय वारकर यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या पाच महिन्यापुर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली होती. लॉकडाऊनमुळे सभापती व उपसभापती पदाची निवडणुक लांबणीवर पडली होती. ती आज मुंबई येथील बाजार समितीमध्ये पार पडली. बीड जिल्ह्याला हे एक सर्वात मोठं पद मिळालं आहे.
मुंबई बाजार समितीची निवडणुक १९ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान होवून २ मार्च रोजी मतमोजणी झाली होती. त्यात महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व संचालक निवडुण आले होते. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या पाच महिन्यापासून सभापती, उपसभापती पदाची निवड झाली नव्हती. अखेर आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ही निवडणुक पार पडली. सदरच्या बाजार समितीत १७ सदस्य असून राष्ट्रवादी कॉंग्रेस १०, कॉंग्रेस ४, शिवसेना १, शेकाप १, अपक्ष १ असे सदस्य निवडुण आलेले होते. आज सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष अशोक डक तर उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे धनंजय वारकर यांनी अर्ज दाखल केले. अन्य अर्ज आले नसल्याने सदरची निवडणुक ही बिनविरोध झाली असून सभापतीपदी अशोक डक तर उपसभापती धनंजय वारकर यांची निवड झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी हे मोठे पद अशोक डक यांच्या माध्यमातून मिळालं आहे. गेल्या चाळीस वर्षापासून डक कुटुंबिय राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले असून अशोक डक यांचे वडिल माजी आमदार गोविंदराव डक यांच्यापासून शरद पवारांचे विचार लोकांपर्यंत पोहचवित आले आहेत. गोविंदराव डक यांचे चिरंजीव व माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक हे औरंगाबाद महसूलमधुन निवडुण अले होते. अखेर एकनिष्ठतेला राष्ट्रवादीत न्याय मिळत असल्याचे पुन्हा एकदा डक यांच्यावर सभापती पदाची जबाबदारी टाकून पवार कुटुंबियांनी फळ मिळत असल्याचे दाखवून दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांचे विचार घराघरात पोहचविणारे अशोक डक मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष झाल्याने त्यांच्या समर्थकात जल्लोष साजरा केला जात आहे.
No comments:
Post a Comment