अंबाजोगाई;-- पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी नगरहून आलेल्या एका टेम्पोचा झाडाझडती घेतली असता त्या टेम्पोमध्ये गोवा,आरएमडीसह आदी गुटखा आढळून आला. जवळपास लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला.ही कारवाई पहाटे 4 वाजता शेपवाडीजवळील भगवानबाबा चौक या ठिकाणी करण्यातआली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री भगवानबाबा चौक, हराळे मिल जवळ पोलिस कर्मचारी संजय बारगजे,रमेश ठोंबरे, बाबूराव घुले, अभिमान भालेराव हे पेट्रोलिंग करत होते.पहाटे चार वाजता नगरहून टेम्पो (एम.एच. 04 जे.के.4782) शेपवाडीकडे येत होता. पोलिसांनी टेम्पो थांबवून आतमध्ये काय आहे अशी विचारणा चालक अंगद वामनराव कदम यांनी केली मात्र त्याने टेम्पोमध्ये कोंबड्याचे खाद्य असल्याचे सांगीतले. पोलिसांना चालकाच्या बोलण्यावर विश्वास वाटला नसल्याने टेम्पोची झाडाझडती घेतली. यात गोवा, आरएमडी हा गुटखा आढळून आला. लाखो रुपयांचा गुटखा टेम्पोत असल्याची माहिती सदरील पोलिसांनी शहरठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षकांनी गुटघ्यासह टेम्पो जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार टेम्पोतील गुटखा जप्त केला.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
No comments:
Post a Comment