Wednesday, August 12, 2020

परळीच्या कोवीड 19 केअर सेंटरची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली पहाणी. संपूर्ण शहराच्या परिस्थितीचा घेतला आढावा.


परळी वैजनाथ ;- परळी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास्वर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.आज कोवीड सेंटरला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली व पहाणी केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सहा प्रमुख शहरे दहा दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी परळी येथील कोवीड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेत सुचना केल्या आहेत.
यावेळी तहसीलदार विपीन पाटिल,गटविकास अधिकारी संजय केंद्रे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,वैद्यकिय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे,वैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश कुरमे,कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ अर्शद शेख,पोनि.बाळासाहेब पवार, पोनि हेमंत कदम नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे अदीची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज शहराचा लाॕकडाउन विषयी आढावा घेतला व शहरातील हमालवाडी व अन्य कंटेन्मेट झोनला भेटी दिल्या आहेत स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment