Saturday, August 22, 2020

गणेशोत्सव व मोहरम निमीत्ताने जिल्ह्यात पोलीस यंत्रणा कडक बंदोबस्तांसह सतर्क , पोलीसांचे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहान .


बीड ;-- मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोहार यांनी गणेशोत्सव व मोहरम बंदोबस्त निमीत्ताने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला कडक व सक्त सुचना दिल्या आहेत.तसेच जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.या काळात तणावपूर्ण वातावरण निर्माण होणार नाही . याची खबरदारी घेण्यासाटीच्या सक्त सुचना पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत . जिल्ह्यात पुढील प्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . गणेशोत्सव व मोहरम निमीत्ताने बीड जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ) जालना , यांच्याकडील 01 कंपनी 3 प्लाटून मध्ये विभागून 03 ठिकाणी असे 01 अधिकारी व 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.तसेच 04 आर.सी.पी तुकड्या जिल्ह्यात 4 ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत . जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता 02 अपर पोलीस अधीक्षक , 05 पोलीस उप अधीक्षक , 23 पोलीस निरीक्षक , 61 सहाय्यक पोलीस निरीक्षक , 75 पोलीस उपनिरीक्षक , 2219 पोलीस कर्मचारी , 700 होमगार्ड तैनात करण्यात आले आहे . अशाप्रकारे जिल्ह्यात एकुण 168 पोलीस अधिकारी , 2298 पोलीस कर्मचारी , आणि 700 होमगार्ड यांना गणेशोत्सव व मोहरम बंदोबस्त संपुर्ण जिल्हाभर लावण्यात आला आहे , मा पोलीस अधिक्षक श्री हर्ष ए पोहार यांनी पोलीस ठाणे प्रभारी यांना सुचना दिल्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी यांनी शांतता कमिटी व गणेशोत्सव मंडळे यांच्या पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेवून महाराष्ट्र शासनाची कोकिड -19 च्या अनुषंगाने गणेशोत्सवा बाबतची नियमावली समजावून सुचना देण्यात आल्या आहेत . अशा जिल्ह्यात 30 बैठका आयोजित करून नियमपुर्वक शांतता राखण्याच्या सुचना समाज बांधवांना दिल्या आहेत . तसेच जिल्ह्यात दि.17-08-2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मा , जिल्हाधिकारी श्री . राहूल रेखावार , मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोदार यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य व अध्यक्ष यांचेसह ठाणे प्रभारी यांची बैठक घेवून गणेशोत्सव नियमावलीच्या कडक अंमलबजावणी बाबत सुचना दिल्या आहेत . गणेशोत्सव व मोहरम अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी 1391 वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे . खोट्या बातम्या , अफवांचे ताबडतोब खंडण करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत , अफवा पसरवणान्यांवर बीड पोलीसांचा सोशल मिडीया सेल 24 तास करडी नजर ठेवून आहे.तसेच सर्व मुख्य शहर ( CCTV ) च्या निगराणीखाली आहेत . तसेच संवेदनशिल गावांना ठिकाणांना वेळोवेळी भेटी देवून सर्व पोलीस ठाणे स्तरावर दंगाकाबू पथकाच्या रंगीत तालमी घेण्यात येत आहेत . दि.22-08-2020 रोजी ( श्रीगणेश चतुर्थी ) गणेशोत्सव स्थापना होत असून 01-09-2020 रोजी ( अनंत चतुर्दशी ) पर्यंत जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.तसेच दि.21-08-2020 ते 30-08-2020 या कालावधी दरम्यान मोहरम असल्याने यावर्षी कोकिड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये , तसेच सर्व नागरिकांनी कोकिड -19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment