परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकुण ८१ ग्राम पंचायतींची मुदत असुन परळी तालुक्यातील सात ग्राम पंचायतींचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या सर्वच निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात ग्राम पंचायतींचाही समावेश आहे. दे कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश काढले आहेत. आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आज आदेश जारी केले आहेत. बीड जिल्हयातील ८१ ग्राम पंचायतींवर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीमध्ये परळी तालुक्यातील ७ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. ग्राम पंचायत व प्रशासक पुढीलप्रमाणे रेवली – एस. व्ही. जाधव (शाखा अभियंता बांधकाम), भोपला – बी. बी. लांडगे (शाखा अभियंता बांधकाम), लाडझरी – वाय. एस. केशोड (विस्तार अधिकारी (सा) पं. स.), मोहा – एल. व्ही. बाभळे (विस्तार अधिकारी (पं) पं. स.), वंजारवाडी – अविनाश लहुरीकर (क. प्रा. अ. पं. स.), गर्देवाडी – डी. आर. गुळभिले (वि. अ. (पं.) पं. स.), सरफराजपुर – एस. व्ही. पालेकर (विस्तार अधिकारी (कृ.) पं. स.) यांचा समावेश आहे.
सदर ग्राम पंचायतींवर उद्या दि. २२ आॅगस्टपासुन जाऊन प्रशासकांनी पदभार घ्यावयाचा आहे. संबंधित प्रशासकांनी मुळपदासह प्रशासकाचे काम सांभाळावयाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Saturday, August 22, 2020
कार्यकाळ संपलेल्या परळी तालुक्यातील ७ ग्राम पंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment