● बळीराजाचा अबाल वृद्धचा प्रथा परांपरा हिरमोड.
परळी वैजनाथ ; (प्रतिनिधी) - बैल पौळा हा सण म्हटलं की गावा-गावातून बैलांची वाजत गाजत निघालेली मिरवणूक.. त्यातील उत्साही वातावरणाने आनंदी झालेले गाव..मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे बैल पौळा सणावर विरजण पडलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत होते.
शेतकरी आणि बैलाचं जिव्हाळ्याचं नातं घट्ट करणारा सण म्हणजेच बैल पोळा. हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने शेतकरी- पशुधन मालक साजरा करतात.मात्र यंदा बैल पोळा सणावर कोरोनाचं सावट आल आहे. गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने बैलांच्या मिरवणूका काढण्यावर प्रतिबंध घातला आहे. तसे निर्देश ग्रामपंचायत व पोलीस पाटलांच्या मार्फत गावागावात देण्यात आले होते.ग्रामीण भागात दवंडी देऊन बैलांच्या मिरवणूका काढू नयेत आशा सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान बीड जिल्ह्यातील सहा शहरात लॉक डाऊन असल्याने बाजार पेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-राजा साठी घुंगरु माळ, झूल रंग-रंगोटीचं साहित्य खरेदी करता आलं नाही. सजलेल्या आपल्या बैलजोड्या गावातून मिरवता येणार नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
वर्षातून एकदा येणाऱ्या या सनावर प्रतिबंध आल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजण ढोल-ताशे, बँड बाजा, हालगी, सनई चौघडा आदींच्या निनादात वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढतात. गावाच्या वेशीतून पहिला बैल मिरवण्यासाठी विशेष मानकरी असतात त्यांचाही यावर्षी हिरमोड झाला. शेतकऱ्यांसोबत बैल वर्षभर काबाडकष्ट करतात. पोळा सणाच्या माध्यमातून त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावर्षीमिरवणूक जरी काढता नाही आली तरी शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या अंगणातच बैलांची विधिवत पूजा केली. त्यांना पुरणपोळी भरवली. अक्षदा वाटून गाय आणि बैलाचा विवाह लावण्यात आला. या सर्व पारंपरिक सोहळ्यात आबालवृद्ध आनंदाने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment