Monday, August 10, 2020

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी कर्मचारी कोरोना बाधीत.


* दोन दिवस कामकाज चालवून नंतर बँक १० दिवस बंद ठेवणार?

बीड (प्रतिनीधी ) जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आला आहे तर सेवानिवृत्त कर्मचार्‍याला काही कालावधीसाठी बेँकेत कामासाठी घेतले होते मात्र हे अधिकारीही बाधीत आले. विद्यमान प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हेही संशयित रुग्ण असल्याने पीक कर्जाचे जे काम आहे ते दोन दिवसात उरकून बँक दहा दिवस बंद ठेवणार असल्याचे चेअरमन आदित्य सारडा यांनी सांगितले. 
बीड शहरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील असा कोणताच भाग नाही की ज्या ठिकाणी रुग्ण बाधीत नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेतही हा कोरोना पोहचला असून त्या ठिकाणी एक कर्मचारी, एक अधिकारी बाधीत आढळून आला आहे. विद्यमान प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हेही संशयास्पद आहेत. त्यामुळे ते होम क्वॉरंटाईन गेल्या तीन दिवसांपासून झाले आहेत. त्यामुळे बँकेतील इतर अधिकारी आणि कर्मचारी हे आपली टेस्ट करून घेत आहेत. बँकेचे पीक कर्जाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसात राहिलेले कामकाज उरकल्यानंतर जे बँकेचे अधिकारी, कर्मचारी दहशतीखाली काम करतात आणि बँकेत जिल्हाभरातून अनेक कर्मचारी आणि अधिकारी ये-जा करतात, शेतकरी ये जा करतात त्यातून समुहसंसर्ग होण्याचा जास्त धोका असल्यामुळे दोन दिवस कामकाज केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक १० दिवस बंद ठेवणार असल्याचे चेअरमन आदित्य सारडा यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment