बीड (प्रतिनिधी )जिल्हा कारागृहातील ५९ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आज जिल्हा कारागृह संपुर्णपणे सॅनिटायझ्ड करण्यात आले असून ५९ पैकी ८ कोरोना बाधीत कैद्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अन्य ५१ बाधीत कैदी कारागृहातच अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले असून त्यांना तेथेच उपचार मिळणार आहेत
काल जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये पाठविण्यात आले होते. यामध्ये जिल्हा कारागृहातील २३४ कैद्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. रात्री जेव्हा या संशयितांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला तेव्हा जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली. कारण कारागृहातील ५९ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. कारागृहातील सर्वच बॅरकमधील दोन-पाच कैदी बाधीत आढळल्यामुळे आज सकाळी पुर्ण जिल्हा कारागृह सॅनिटायझ्ड करण्यात आले. सॅनिटायझरसह पाण्याने पुर्ण कारागृह स्वच्छ धुवून काढण्यात आले. बाधीत असलेल्या ५९ कैद्यांपैकी ८ कैद्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर अन्य ५१ बाधीत कैद्यांची अवस्था जिल्हा कारागृहातच करण्यात आली त्यांना तेथेच उपचार मिळणार आहे.
No comments:
Post a Comment