
* चौघाविरुध्द ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा.
परळी वैजनाथ ; (प्रतिनीधी )- तालुक्यातील मिरवट येथे चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ मारहाण करत शारीरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन २५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, परळी तालुक्यायातील मौजे मिरवट येथे आरोपीतांनी संगमत करुन २५ वर्षीय महिलेला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ मारहाण करत तिला शारीरीक, मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. मयताची आई सिता मिलिंद सरवदे (रा.धानोरा ता.अंबाजोगाई जि.बीड) यांच्या फिर्यादीवरुन राहुल कुंडलिक कसबे यांच्यासह इतर तीन जणांविरुध्द गु.र.नं.२३२/२०२० कलम ३०६, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज जिरगे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment