* निराधार अनुदान दोन वर्षा पासून मंजुर,परंतु अता पर्यंत खात्यावर पैसे जमा नाही .
बीड (प्रतिनिधी);--बीड मधील श्रावण बाळ,संजय गांधी निराधारांच्या फाईली २०१८ मध्ये जमा करण्यात आल्या व त्या लोकांना मंजूर देखील झाल्या असुन आतापर्यंत या लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही व कसलीच मिटिंग देखील घेण्यात आलेली नाही दररोज वृद्ध नागरिक व निराधार लोक तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु त्यांचा खुळंबा होताना दिसत आहे.
बीड तहसील कार्यालयात गरजु व गरीब निराधार वृद्ध परीतत्का विधवा गेले दोन वर्षांपासून स्वताःचा वेळ व रोजंदारी बुडवून कागदपत्रे जमा करण्यासाठी हजार पाचशे रुपये खर्च करून कागदपत्र्याची पुर्तता करतात आणि सगळ्या कागदपत्रे देवून देखील लाभार्थींयाना कसलाही अनुदान भेटत नाही ना ही योग्य ते उत्तर भेटतो कित्येक लोकांना दररोज चकरा माराव्या लागतात.
आणी सांगण्यासारखं म्हणजे कित्येक लोक योजनेला पात्र असुन देखील मंजुरी भेटेली दिली नाही.
कोरोना सारख्या आपत्ती मध्ये आपले उदरनिर्वाह भागवण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी थोडासा वेळ काढून लक्ष घालावे व लाभार्थीयांना लाभ मिळुन द्यावे अशी मागणी लाभार्थीयाकडुन होत आहे.
बीड तहसील कार्यालयात तोंड बघुन काम होतात का?
बीड तहसील कार्यालयात तोंड बघून काम होतात का? असा प्रश्न लाभार्थीयांना उपस्थित होत आहे करण आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी स्वतः जाऊन सगळ्या कागदपत्राची पूर्तता केली तरी देखील अता पर्यंत मंजुरी भेटली नाही व ज्या लोकांना मंजुरी देण्यात आली त्यांचे खात्यात पैसे जमा नाही
No comments:
Post a Comment