
धारूर (प्रतिनीधी ) पती कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने त्याला उपचारासाठी आरोग्य विभागाने नेले असता याचा धक्का घेत भितीपोटी सदरील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे समोर आली असून कोरोनाची भिती आणि दहशत आजही लोकांच्या मनात असल्याचे यावरून समोर येते.
धारूर तालुक्यातील गावंदरा येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट काल पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी सदरच्या व्यक्तीला कोवीड सेंटरमध्ये नेले. याचा धक्का पत्नीला बसला आणि तिचा रात्री मृत्यू झाला. गावंदरा येथील पाच व्यक्तीचे स्वॅब परवा कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी या ६० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता त्या चार व्यक्तींमध्ये सदरच्या व्यक्तीच्या पत्नीचाही स्वॅब घेण्यात आला होता मात्र ती नेगेटिव्ह आली होती. आपल्या पतीला कोरेाना झाला आहे या भितीने सदरील महिलेचा धक्का सहन न झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनाबाबत अद्यापही सर्वसामान्य नागरीकात भिती असल्याचे या घटनेवरून पुढे येत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत जनजागरण आणि लोकांमधील कोरोनाची दहशत संपुष्टात यावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
No comments:
Post a Comment