परळी वैजनाथ ;-- कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याने दि.12 ते 21 आॕगस्ट दरम्यान जिल्हयातील बीड,गेवराई ,माजलगाव,अंबाजोगाई,केज आष्टीसह परळी शहर पुढील 10 दिवसासाठी जिल्हा प्रशासनाने लाॕकडाउनची घोषणा केली.
याच दहा दिवसाच्या काळात गोकुळाष्टमी, गोपाळकाला, पतेती, पोळा ,श्री गणेश चतुर्थी व ऋषिपंचमी यासारखे सार्वजनिक उत्सव /सण सण उत्सव आल्याने बाजारात मोठी गर्दी झाली.
किराणा,कटलेरी,भुसार,आडत,कापड अदी व्यापारात आज खरीददारांनी करताना दिसुन आली.कोरोनाचा कुढलाच संसर्ग आपल्याला होणार नाही,मनात कुढलीच भिती न बाळगता लोकानी बाजारात गर्दी केली.तोडांला मास्क विना कुढलाच डिस्टंस् पाळला गेला नसुन बिनधास्त फिरताना परळीकर दिसत होती.
शहरातल्या स्टेट बॕक असो वा पतसंस्थेत आर्थिक व्यवाहारासाठी नागरिकांची झुंबड उडली पाहायला मिळाली.प्रत्येक नागरिक कोणत्याना कोणत्या खरेदीला घाई करत कसरत करत होता.
परळी शहरातील सर्व रस्ते गर्दीने तुटुंब भरली होती.तालुक्यातील प्रत्येक गावचा माणुस खरेदी विक्री करण्यासाठी शहरात आला होता.प्रत्येक रस्ता अॕटो रिक्षा,चारचाकी वाहने मोटार सायकलीनी चक्काजाम झाला होता.परळी शहराचा दिवसभराच्या गर्दीने दम घुटल्याच चित्र दिसुन आले.
No comments:
Post a Comment