Friday, August 21, 2020

नववीचा विद्यार्थी मुहम्मद फुजैल. सात महिन्यात बनला हाफ़ीज़ ए क़ुरआन.

 



औरंगाबाद (प्रतिनीधी ) येथील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मुहम्मद फुजैल (वय१४वर्षे) याने अवघ्या ७ महीने ६ दिवसांच्या अल्प काळात क़ुरआन मुकपाठ करुन हाफ़ीज़ ए  क़ुरआन बनण्याचा बहुमान प्राप्त केला. यामुळे मुहम्मद फुजैल चे मुस्लिम समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्याने ही उपलब्धी शाळेतील शैक्षणिक शिक्षण घेता-घेता हर्सूल टि पॉईंट औरंगाबाद येथील अरबी मदरसा जान मुहम्मद, बेरी बाग येथे प्राप्त केली आणि हाफ़ीज़ ए क़ुरआन बनला. या यशाबद्दल त्याचे मौलाना हाफ़ीज़ नजीर सिराजी, कारी अमीनोद्दीन जामेई, मौलाना अहमद आरेफी, आई-वडील आणि नातेवाईकांसह बीड शहरातून पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment