बीड (प्रतिनीधी )- शहरासह जिल्ह्यात कारोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि आरोग्य अधिकारी, कर्मचार्यांची अपुरी संख्या पाहता जिल्हा आरोग्य विभागाने बीड जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी पदांसाठी थेट मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला असून वृत्तपत्रातून तशा जाहिराती आरोग्य विभागाने प्रकाशीत केल्या आहेत. सदरच्या मुलाखती ह्या १२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत.
बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे तर १३०० पेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात प्रत्यक्षात उपचार घेत आहेत, परंतु जिल्ह्यातील कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांना व्यवस्थीत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनुष्यबळ कमी असल्यामुळे डॉक्टर, कर्मचार्यांची अपुर्ण संख्या असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कर्मचार्यांची संख्या वाढवण्याबाबत मागणी केली असता अखेर आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी स्वरुपात थेट मुलाखतीच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रकाशीत केल्या असून १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment