परळी वैजनाथ ;- परळी शहरात वाढत असलेला कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर परळी शहरात विनाकारण प्रवेश करणार्या व शहरात फिरणार्यांना पोलिसी खाक्याचे दर्शन मिळाले.अनेकांना प्रसाद मिळाल्यानंतर सकाळी शहरात सुरु असलेली वाहतुक तात्काळ बंद झाली.संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार यांनी दिवसभर गस्त करत परिस्थिती हाताळली.
परळी शहरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची साखळी तुटावी यासाठी जिल्हाधिकार्यांनी दि.12 ते 21 ऑगस्ट दरम्यान परळी शहरात संचारबंदी घोषीत करुन काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दोन दिवसापूर्वी दिल्यानंतर आज बुधवारी सकाळी शहरातील रस्त्यावर दुचाकिंची तर शहरात प्रवेश करणार्या वाहनांची वर्दळ दिसत होती.संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार यांनी गस्त घालत चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला.उड्डाणपुलावर प्रवेश करताना बाहेरुन येणार्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती.यात अनेकजन दवाखाना व इतर महत्वाच्या कामाचे नाव सांगत विनाकारण फिरत असल्याचे आढळल्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद मिळाला.पोलिसांच्या या कडक भुमिकेमुळे विनाकारण फिरणारे रस्त्यावरुन गायब झाले व दिवसभर शहरातील रस्ते निर्मनुष्य होते.संपुर्ण बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने मोंढा व बाजारपेठेत शुकशुकाट होता.
@@@@@@@
नागरीकांनी घराबाहेर पडु नये
परळी शहरात आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन घोषीत केला असल्याने शहरातील नागरीकांनी घराबाहेर पडु नये व कोरोना ची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
– बाळासाहेब पवार
पो.नि.संभाजीनगर पोलिस ठाणे.
No comments:
Post a Comment