Monday, August 17, 2020

अवैध वाळु वाहातुक.पावती जालना ते कोल्हापूरची. बीडमध्ये वाळु माफीयांची नवी शक्कल.

 


बीड (प्रतिनीधी )ः शासनाचा कर चुकवत सर्रासपणे वाळू माफियांकडून वाळुची तस्करी होत असतानाच आता तस्करी करण्यासाठी वाळु माफियांनी नवीन शक्कल काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून व्यवस्थेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी जालना ते कोल्हापूर अशी बनावट पावती जवळ ठेवून वाळुचा उपसा मात्र बीड जिल्ह्याच्या नद्यातूनच करायचा आणि त्याची विक्रीही बीड जिल्ह्यातच करायची हे आज बीड शहर पोलिसांनी उघडकीस आणलं. या प्रकरणी एक टिप्पर ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी तहसीलदारांचे मार्गदर्शन मागवल्याचे सांगण्यात येते.
     गोंदी जि.जालना येथुन वाळु घेवून ती कोल्हापुरला नेत असल्याची  पावती वाळु माफीया घेत असून पोलीसांनी जर गाडी पकडलीच तर ही पावती त्यांना दाखवतात. अन्यथा बीड शहरासह जिल्ह्यात वाळुचा पुरवठा केला जातो. त्यासाठी बीड जिल्ह्याच्या हद्दीतूनच वाळुचा उपसा होतो. आज सकाळी असेच एक विना नंबरचे टिप्पर शहरातून बार्शी नाक्याकडे जात असतांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कागदपत्राची विचारपुस पोलीसांनी केली असता त्यांने गोदी येथुन वाळु घेवून ती कोल्हापुरला नेत असल्याची पावती पोलीसांना दाखविली. मात्र तो बीड शहरात का आला? टिप्परवर नंबर प्लेट का नाही? म्हणून पोलीसांनी गाडी शहरा ठाण्यात लावली. त्यानंतर ति पावती पाहीली असता पोलीसांना ति बनावट असल्याचा संशय आल्याने ति पावती खरी की खोटी? या संदर्भात महसुल विभागाचे मार्गदर्शन मागवले असून त्यानंतर त्या टिप्परवर कारवाई होणार आहे. मात्र असे अनेक टिप्पर आहे जे की, पावती गोदी जि.जालना ते कोल्हापुरची घेतात आणि वाळु बीड शहरासह जिल्ह्यात पुरवीतात. 

No comments:

Post a Comment